मुकींदपूर नगरी मध्ये सद्गुरू बाळूमामांची पालखी !

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


आर्णी तालुक्यातील मुकींदपूर नगरी मध्ये सद्गुरू बाळूमामा यांची पालखी आली आहे.
धनगर समाजामध्ये सदगुरू बाळूमामा यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
धनगर हा समुदाय भटकंती करणारा आहे.शेळ्या-मेंढ्या चारून आपली जगणूक करणे एवढ्या पुरताच हा समुदाय मर्यादेत राहिला नसून अनेक क्षेत्रांत या समुदायाने प्रगती केल्याचे दिसून येत आहे.
सद्गुरू बाळूमामा यांचा जीवन परिचय आणि आरतीचा कार्यक्रम रोज होत आहे. आजूबाजूच्या गावातील भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा आस्वाद घेतांना आढळून येत आहे.
आजूबाजूच्या खेड्यातील मंडळी येत असल्याने त्या परिसरामध्ये खेळण्यांची व मातीच्या मूर्त्यांची दुकाने लागली आहेत.
सामाजिक क्षेत्रांत काम करणारी मंडळी सुद्धा बाळूमामा यांच्या पालखी स्थळाला भेटी देतांना दिसत आहेत.त्यांपैकिच आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.कृष्णाभाऊ पावडे यांनी सुद्धा पालखी स्थळाला भेट देऊन अन्नदान कार्यात सहभाग नोंदविला आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी