प्राथमिक शिक्षक संघाची दिवाळी वृद्धाश्रमात

5

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या आर्णी शाखेच्या वतीने सुशिलाबाई वृद्धाश्रम व अनाथालयात दिवाळी साजरी करण्यात आली
आर्णी तालुक्यातील तेंडोळी उमरी रोडवर चाळीस वृद्धांचे वृद्धाश्रम सुरू असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष व को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदासभाऊ जाधव यांच्या पुढाकारातून शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमात मिष्ठान्न भोजन देऊन दिवाळी साजरी केली. हिवाळ्याचे दिवस लक्षात घेऊन 40 वृद्धांना स्वेटरचे वाटप संघटनेच्यावतीने करण्यात आले. दिवाळीच्या पावन पर्वापासून शिक्षक संघाने आणखी एक नवीन उपक्रम सुरू केला असून आर्णी शहरात फुटपाथवर तथा इतर ठिकाणी बेवारस असणाऱ्या निराधार लोकांना दररोज रात्री त्यांच्या ठिकाणी जाऊन जेवणाचे डब्बे देण्याची व्यवस्था शिक्षक संघाने केली आहे.
वृद्धाश्रमातील या दिवाळी महोत्सवात संस्थाचालक खुशालराल नागापुरे, संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शनजी चव्हाण, बबनराव मुडवाईक ,विश्वंभरराव उपाध्ये,सुरेशराव पवार, प्रेमजी किसन राठोड, गजाननराव ठाकरे, अनिलराव भालेराव, रवीजी चिद्दरवार, सुधीरजी कोषटवार, रामप्रकाशजी पवार,सुनीलजी राठोड,आसारामजी चव्हाण यांचेसह संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.