
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
सध्या यवतमाळ जिल्हात पावसाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. आज ,”एक दिवस शेतकऱ्या सोबत या संकल्पाने त्यानी राळेगाव तालुक्या तिल सावंगी पेरका या गावी शेतकरी मनोज धुमने यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत बांधलेल्या विहिरीला भेट देऊन पाहणी केली.तसेच मातोश्री पांदण रस्ते अंतर्गत मंजूर पारधी बेडा ते निधा या 2 km रस्त्याचे भूमी पूजन करून गवकऱ्यातून स्वच्छ भारत मिशन ची प्रभावी अमाल बजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे यातील रस्त्यावरिल नाल्याची समस्या लक्षात घेऊन त्या अनुषंगाने अंदाज पत्रकात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकरी यांच्या संकल्पनेनुसार आज तालुक्यात एकाच दिवशी शेतकरी आत्महत्या ग्रस्त 45 लाभार्थ्यांना नॅनो युरिया, तुरीचे बियाणे आणि पीक पोषण किट वाटप करण्यात आले. गुजरी आणि वातखेड या दोन गावात लाभार्थी आत्महत्या ग्रस्त18 व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मदत करण्यात आली.
आज दौऱ्या दरम्यान ग्रामीण रोजगार निर्मिती असणाऱ्या सोलर चरखा युनिट चालविणाऱ्या मधुकर कमाराम यांचे घरी भेट देऊन सदर व्यवसायातील अडी अडचणी जिल्हाधिकारी यांनी जाणून घेऊन पोकरा जिल्हा उद्योग विभाग कडून मदतीचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात पीककर्ज पुरवठा,जळजिवन मिशन,मातोश्री पांदण रस्ता यावा आढावा घेतला.तालुक्यातील प्रशासन यंत्रणेला मार्ग दर्शन केले.
या प्रसंगी शैलेश काळे उपविभागीय महसूल अधिकारी राळेगाव,.. डाॅ रवींद्र कानडजे तहसिलदार आणि सुनील चव्हाण तहसिलदार कळंब हे उपस्थित होते.
