
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
डॉक्टर संदीप धवणे रुग्णालयात राडा, डॉक्टर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप
अवधूत वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महेश भवन परिसरातील धवणे हॉस्पिटलमध्ये 3 दिवसांपूर्वी अतुल गावंडे यांना सर्पदंश झालेले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासातच रुग्ण अतुल गावंडे यांचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर संदीप धवणे याना जाब विचारला असता डॉक्टर संदीप धवणे यांनी रुग्णाच्या नातेवाईकास रुग्णालयाच्या बाहेर काढून देण्यास सांगितले त्यामुळे संतप्त नातेवाईक व डॉक्टर संदीप धवणे यांच्यात वाद होऊन संदीप धवणे व रुग्णाचे नातेवाईकात चांगलाच राडा झाला डॉक्टर आपली मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
