राळेगाव तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती ,पुराने केले राळेगाव तालुक्यातील अनेक गावाचे नुकसान ,ढगफूटीसारखा पाऊस ?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात दि. 09/07/2022 तारखेला दुपारी दोन वाजेपासुन पावसाने सुरवात केली आणि पावसाने खुप रौद्र रूप धारण केले..आजपर्यंत जवळपास खुप वर्षांपासून राळेगाव तालुक्यात इतका पुर आला नाही तेवढा दि. 09/07/2022 तारखेला भयानक पुरस्थिती निर्माण झाली..राळेगाव तालुक्यात अनेक गावात लोकांच्या घरात पाणी घुसले ,अनेक लोकांच्या जनावरांच्या कोढयात पाणी घुसले, जनावरांचा चारा खराब झाला, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले ,शेती पाण्यामुळे खरंडुन गेली आहे. राळेगाव आजपर्यत खुप वर्षांपासून पुर आला नाही तेवढा यावर्षी दि. 09/07/2022 तारखेला पुर आला आहे तरी राळेगाव तालुक्यातील पुरपरीस्थीतीची पाहणी करून वरीष्ठ अधिकारी यांनी झालेल्या नुकसाननची भरपाई शेतकरी व ज्या लोकांच्या घरामध्ये पाणि घुसले ,ज्या लोकांच्या गोढयामधे पाणि घुसुन नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत जाहिर करावी अशी जनतेची मागणी आहे.