
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
27 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याचे सरकारने जे पावसाचे प्रमाणीकरण केले आहे त्यामध्ये जो पाऊस पडला आहे, तो मागील 27 दिवसात 22 दिवस पाऊस पडला आहे तो सुद्धा ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीला मान्यता देतो, तर मागील 27 दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण पावसाळ्याच्या 56 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आहे ते सरकारकडे सगळ्या प्रमाणात त्याची नोंद झाली असून त्या नोंदीनुसार यवतमाळ जिल्ह्याची सध्याची परिस्थिती ही ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्याची गरज नसून सरकारच्या अहवालानुसारच रीतसर यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करता येतो. तरी ओल्या दुष्काळाचे जी सरकारी मदत जी लागते ती, व विमा ज्या शेतकऱ्याने काढलेला आहे त्यांना त्वरित दोन्हीही रकमा देण्यात याव्या. अशी विनंती शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी, व कृषी अधीक्षक, यांना करण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय निवल,जलतज्ञ मीलिंद दामले, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे, जयंतराव बापट, मनोज पाझघरे सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
