भरधाव टाटा एस च्या धडकेत बैलजोडी ठार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)


राळेगाव तालुक्यातील वडकी येथे बळीराजा होटेल समोर झालेल्या भिषन अपघातात बैल जोडीचा जागीच मृत्यु. वडकी येथील संतोष नामदेव डवरे हा बैलजोडी नेहमी प्रमाणे अरुन येरेकार यांच्या शेतात चारा पाणी करण्या करीता घेऊन जात होता. आज दिनांक १८ एप्रील दुपारी ४ वाजताच्या सुमारास बैले चारा पाणी करून घरी जात असता भरधाव हिंगणघाट कडून येणाऱ्या टाटा एस ( एम एच-२९ बिई-४९५७ ) ने धडक दिली हि धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन बैल जागीच ठार झाले असुन गाडी चालक सौरभ वानखडे गाडी घेऊन पसार झाला असता वडकी येथील तरून सुरज येरेकार, परिक्षित फुटाणे, समीर येरेकार व ब्रम्हानंद कोरडे यांच्या सहकार्याने गाडीचा पाठलाग करत गावानजदीकच्या तुवर मार्केट मध्ये गाडी पकडुन पोलीस स्टेशन ला जना करण्यात आली. या घटनेची माहीती सुरज येरेकार यानी वडकी पोलीस स्टेशनला दिली असता वडकी येथील बीट जमदार किरण दासरवार व रमेश मेश्रान यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. शेतकऱ्याचे जवळपास एका लाखाचे नुकसान झाले असुन पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत.