अतुल ठाकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

 

घाटंजी येथील स्थानिक शि. प्र. मं. माध्यमिक कन्या शाळेचे शिक्षक श्री अतुल सुरेvशराव ठाकरे सर यांना विज्ञान व तंञज्ञान क्षेञातील उल्लेखनिय कार्याबददल महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिनांक 15 मे 2022 रोजी अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी, पुणे येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विक्रम काळे (शिक्षक आमदार) व कार्यक्रमाचे उदघाटक निशिगंधा वाड (सिनेअभिनेञी) यांचा हस्ते मानपञ, मोमोट व शाल श्रीफळ देउन श्री. अतुल ठाकरे व सौ. श्रीया अतुल ठाकरे सहपत्नी राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आला. विज्ञान शेञातील विशेष कार्य
श्री अतुल सुरेशराव ठाकरे सर यांनी International Level Model Making Competition मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करता घवघवीत यश संपादन केले. अतुल सर ने तयार केलेली शिक्षक प्रतिकृती आलेखालाचा मदतिने गणित याला आंतरराष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही महाराष्ट्राचे एकमेव शिक्षक प्रतिकृती आहे. तसेच ठाकरे सर यांचा प्रयोगाची दखल माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी 2015 मध्ये भारत विज्ञान मेळाव्या मध्ये प्रयोगाची दखल घेउन भेट दिली. तसेच शांततेचा नोबल पुरस्कार विजेता श्री. कैलास सत्यार्थी यांनी प्रयोगाची पाहनी केली. ठाकरे सरांचा मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 वेळा, भारत स्तरावर (India Level) 2 वेळा, राष्ट्रीय स्तरावर 7 वेळा, राज्यस्तरावर 8 वेळा प्रयोगाने सहभाग नोदविला आहे.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व विज्ञान, तंञज्ञान क्षेञातील उल्लेखनिय कार्याबददल शि. प्र. मं. संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. गीलाणी, उपाअध्यक्ष श्री. ए. एस. गीलाणी, सचिव ॲड. अनिरुध्द लोणकर, संचालक श्री. असलम एस गिलाणी, संचालीका आलीया शहजाद, गिलाणी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शहजाद सर, शि. प्र. मं. माध्यमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. मुनेश्वर मॅडम, पर्यवेक्षक श्री. डी. एस. सपकाळ सर, सर्व शिक्षक, शिक्षीका कर्मचारी व़ृदांनी अभिनंदन केले.