
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष ,पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी ,यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा कृतज्ञतेचा आणि निमंत्रितांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी तळेगाव ( भारी) येथील कासाबाई चिंधुजी पुरके सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.डाॅ.श्री.रमाकांतजी कोलते सर कार्याध्यक्ष ,९२ वे अ.भा.साहित्य संमेलन हे होते.स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके साहेब,प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ सौ.माधुरीताई मडावी , जिल्हाध्यक्ष अंकुर साहित्य संघ यवतमाळ सौ.विद्याताई खडसे,श्री पुरुषोत्तमजी ओंकार सर ,माजी शिक्षणाधिकारी श्री अशोकराव आठवले , साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते माजी गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तमराव गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके,माजी शिक्षणाधिकारी अशोकजी आठवले , पुरुषोत्तमजी ओंकार सर यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले .आपले अध्यक्षीय विचार रमाकांतजी कोलते सर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी गटशिक्षणाधिकारी उत्तमराव गेडाम यांनी केले .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंदजी मडावी यांनी केले.दुसरे सत्र कविसंमेलन निमंत्रितांचे..या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रा.माधवराव सरकुंडे हे होते . या मध्ये कवि विनयजी मिरासे, सुप्रसिद्ध गझलकार किरणकुमार मडावी, सुप्रसिद्ध कवी ,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ,अकोला अनंतजी राऊत , सुप्रसिद्ध कवी यवतमाळ जयंतजी चावरे , सुप्रसिद्ध कवयित्री, अमरावती सौ.अलका तालणकर प्रामुख्याने उपस्थित होते….कवि अनंतजी राऊत यांची दुःख अडवायला उंबऱ्यासारखा…मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा….आणि अंधाराच्या छाताड्यावर ठिणग्या पेरत जावे .. आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे …
आणि सौ.अलका तालणकर यांनी सादर केलेल्या मन झुरलं..
मन झुरलं….बालपण सुखातलं..कसं फिरे भोवताली..खेळ भांडे सण भात..आहे रिकामीच खोली ..दे लहानपण देवा .. नाही मनच भरल…याद येते माहेराची ..मन झुरलं…..आणि धर्म नाही,पंथ नाही,एक ऐसे गाव दे…माणसाला फक्त आता माणसाचे नांव दे…पेटते ज्वाला चितेची..रोज फाशी घेऊनी..
जीव कवडीमोल झाला…तो क्षणाला भाव दे..माणसाला फक्त आता माणसाचे नांव दे..व इतरही कविंनी आपल्या अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरण करत ,एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळविली . शब्दलंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली.या कार्यक्रमात प्रा.श्री.रमाकांतजी कोलते,माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके,श्री.अशोकराव आठवले ,श्री. उत्तमराव गेडाम,श्री. पुरुषोत्तमजी ओंकार,श्री.नरेन्द्रजी मानकर,श्री विलासजी राठोड,प्रा.श्री.मेनकुदळे,सौ.विद्याताई खडसे,सौ.पुष्पाताई नागपूरे, सौ.जयाताई पोटे,सौ.स्वातीताई येंडे,श्री.राजुभाऊ पोटे ,श्री.मोहनजी बनकर,श्री राजुभाऊ पांडे, श्री.वासुदेवराव मोतीकर,श्री जिनेन्द्रजी ब्राह्मणकर, श्री नितीनजी पखाले,श्री.सुरेशजी कनाके,श्री.पवनकुमार आत्राम,श्री .गुलाबजी कुडमथे,श्री.श्रीमंतकुमार गेडाम,देशपांडे सर, धर्माधिकारी सर,गजघाटे सर,नांदणी या सह अनेक सर,भोंगाडे सर,धुमाळ सर,सिडाम सर,शिंदे सर ,प्रशांतजी कुसराम यासह इतर गणमान्य बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्या गोष्टी विषयी आदर मनात असल्यास तो कृतीत सहज उतरतो असे म्हणतात त्याच वृत्तीने या कवि संमेलनाचे सुत्र संचालन किरणकुमार मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी शिक्षणमंत्री प्रा वसंतरावजी पुरके यांनी केले.
