
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यातील देवाळा शिवारात बेंबळा कॅनल जवळ एका वृद्ध इसमाचा मृतदेह आज मंगळवारला सकाळी आढल्याने खळबळ उडाली आहे.७५ वर्षीय इसमाच्या मृत्यूने वेगवेगळ्या तर्काला परिसरात उधाण आले आहे.
रामचंद्र लटारी निखाडे असे शिवारात मृतदेह आढळलेल्या वृद्धांचे नाव आहे.मृतकाचा मुलगा अंकुश निखाडे यांनी सोमवारला वडील बेपत्ता असल्याची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.तत्पूर्वी नातेवाईक यांचे कडे वडीलाबाबत चौकशी केली मात्र त्यांचा कुठेच शोध लागला नसल्याने.आज दि.१७ मे रोज मंगळवारला सकाळी बेपत्ता असलेल्या रामचंद्र निखाडे यांचा मृतदेहच देवाळा शिवारात बेंबळा कॅनल जवळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान मृतक हा दि.१५ मे रोजी शेळ्या चारण्यासाठी गेले असता ते घरी परत आले नसल्याने दोन दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने झाला यांचे कारण सध्या तरी गुलदस्त्यात आहे.मारेगाव पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून मृतदेदाची उत्तरीय तपासणी अंती मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
