
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ब्रेक दि चेन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले गेले आहेत.आता शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुधारित आदेश काढून अधिक कठोर केले आहे.
त्यानुसार रविवार ०९ मे ते शनिवार १५ मे च्या सकाळी ०७ वाजेपर्यंत आवश्यक वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी घातली आहे.
विनाकारण घराबाहेर पडल्यास २०० रू. दंड व त्याची जागच्या-जागी कोविड चाचणी होईल. पोझिटीव्ह आल्यास तात्काळ त्यांची दवाखान्यात भरती केले जाईल.
हा आदेश यवतमाळ शहरासह
संपूर्ण जिल्ह्यासाठी १५ मे च्या सकाळी ०७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
अत्यावश्यक सेवा दुकाने ०७ते ११,कृषी सेवा केंद्रे ०७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष सुरू राहणार. खाजगी,शासकीय,निमशासकीय कार्यालये बंद.
अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने चालू ठेवल्यास ५० हजार रू. दंड व गुन्ह्याची कारवाई केली जाईल.
वृत्तपत्र वाटपास मुभा,लग्न आटोपते घेणे इत्यादी बाबी नवीन आदेशात जिल्ह्याधिकारी यांनी समाविष्ट केल्या आहेत.
