
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरांमध्ये अवैध कीटकनाशक विक्री करत असल्याची माहिती मिळताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी तपासणी केली असता दुकानांमध्ये कीटकनाशके विक्रीस मान्यता न घेता विक्री केल्याचे आढळले त्यानुसार कीटकनाशक कायदा 1968 या नियमानुसार मे. गणपती ट्रेडर्स ढाणकी परवानाधारक श्री आनंद विष्णुकांत येरावार यांचे कीटकनाशके परवाना 30 दिवसासाठी निलंबित करण्यात आला आहे
मे. गणपती ट्रेडर्स या कृषी दुकाना विरोधातात बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केल्याने त्या दुकानाची चौकशी श्री. एस. बी. जाधव गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी परवानधारक श्री. आनंद विष्णुकांत येरावार मे. गणपती ट्रेडर्स ढाणकी यांचे कीटकनाशके व स्थापनेची तपासणी केली असता बऱ्याच त्रुटी आढळून आल्या
अवैध कीटकनाशक साठा, भाव फलक लावलेले असून त्यावर सर्व कीटकनाशकाचा समावेश केला नाही , जोडलेल्या यादीत कीटकनाशके विक्री करिता असलेल्या दुकानात कीटकनाशके विक्रीस मान्यता न घेता विक्री केल्याचे आढळले, साटा व विक्री रजिस्टर अद्यावत भरले नाही, रजिस्टर मध्ये विक्रीला ठेवलेल्या सर्व कीटकनाशकाचा साठा पुस्तकात नोंद घेतल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे कीटकनाशक कायदा 1968 व कीटकनाशक नियम 1971 अन्वये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ श्री नवनाथ कोळपकर यांनी परवानाधारक श्री. आनंद विष्णुकांत येरावार, यांचे मे. गणपती ट्रेडर्स यांच्या आस्थापने चा कीटकनाशके परवाना 30 दिवस करिता निलंबित करण्याचे आदेश दिले आहे सदर आदेश 19 मे 2022 पासून लागू झाला सदर त्यामुळे कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे
