
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ढाणकी येथील सुप्रसिद्ध व्यापारी रंगनाथ नारायण कोडगीरवार यांच्या लग्नाचा तब्बल 57 वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या रंग रंजना नावाने प्रसिद्ध असलेल्या वास्तू समोर त्यांच्या स्नुषा शिवानी कोडगिरवार यांनी भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर रांगोळी काढली होती . हल्ली आपण बघतोच आहे की माणसाचे सरासरी आयुष्यमान हे 58ते 60 वर्ष झाले आहे पण हा जन्म दिवस नव्हता तर लग्नाचा वाढदिवस होता ते पण तब्बल 57 वा आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो की , एकमेकांना भेटायला आणि आपुलकीने हितगुज करण्यास फारसा वेळ कोणाकडे नसतो पण एवढे वय होऊन सुद्धा रंगनाथ राव उर्फ ताता ना लग्न वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुण आणि वयोवृद्ध मंडळी तितक्याच तत्परतेने या सोहळ्यास हजर होते हे विशेष !! एखाद्या व्यक्तीचं वय 57 वर्ष झाले की तो थकल्यासारखे करतो पण आज रोजी ताता चे वय 84 असून ते तितक्याच चोखपणे आपली दैनंदिन कामे स्वतः करतात , आजही दुकानात न थकता 8 ते तास बसून तितक्याच तत्परतेने आपली दुकानातील कामे पार पाडताना दिसतात .या कार्यक्रमाला सर्वाची उपस्थिती बघून मला फार आनंद वाटतो आहे ,लग्न संस्कार टिकवायचे असतील तर एकमेकांना समजून घेणे ,काहीवेळा तडजोड करणे ,सामंजस्याने राहणे केले तर लग्न गाठ पक्की राहील .आजकाल लगेच लग्न तुटतात हे बघून दुःख होते असे ताता नी पत्रकार प्रवीण जोशी यांना बोलताना सांगितले.
बाबा चे वय 84 आहे आणि लग्नाचा 57 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला आहे पण आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी आबालवृद्धांना आपलंसं केलं आहे .व्यापारातील त्यांची न थकता कामे करण्याची पद्धत ही आम्हा तरुणाला लाजवेल अशीच आहे .
रुपेश कोडगीरवार व सौ .शिवानी कोडगीरवार
