
(बोटोणी) गोदाम पोड येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदाम पोड येथील वास्तव्यात राहत असलेल्या युवतीने गोदाम पोड शिवारात – दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केली असल्याची घटना आज दि.14 एप्रिल रोज गुरूवारी सकाळी 6ः 30 वाजताच्या सुमारास गोदाम पोड शिवारात ही, घटना उघडकीस आली.
अस्मिता गोपाळ टेकाम (वय18, रा. गोदाम पोड, बोटोणी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.मारेगाव पोलीसांना याघटनेची माहिती देण्यात आली असुन माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन याघटनेचा पंचनामा करणाचे काम चालू होते. अस्मिता ही मंगळवार पासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाइकाकडून सांगण्यात आले आहे. अस्मिताच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
