
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ अनाथ असलेली चंदा श्यामराव कासार (वय 20) हिला न्याय मिळत नसल्याने तिने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने होणारा अनर्थ टळला. पेट्रोल अंगावर घेताच पोलिसांनी चंदाला ताब्यात घेतले.
कासार वरुड (ई) येथील रहिवासी असून तिला आई-वडील नाहीत. तिच्या वडीलांची गावात जागा व शेती असून काकाच्या मुलाने त्या जागेवर घर बांधून ताबा घेतला आहे. त्यामुळे चंदा हिला राहण्यास घर तर नाहीच पण जागाही नाही. तिच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.अतिक्रमण का केले याचा जाब विचारण्याकरिता चंदा गेली असता तिलाच मारहाण करण्यात आल्याचा तिचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार करण्याकरिता चंदा जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. मात्र, तिला न्याय मिळाला नसल्याने तिने हे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. चंदा कासारला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
