जागजई,येथिल गोंडवाना समाज संस्कृती चे श्रध्दास्थान मुलभूत सुविधा पासून वंचित,राजकीय पुढारी कधी लक्ष देणार- मधुसूदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील जागजई येथिल गोंडवाना समाजातील “‘देव आंघोळ”‘आणि देवदर्शन करण्यासाठी हजारो वर्षांपासून ची संस्कृती आहे, आणि परंपरा आहे. परंतु अजून ही या धार्मिक स्थळी एक ही मुलभूत सुविधा उपलब्ध झाली नाही या कडे राजकीय पुढारी जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहे हा सामाजिक अन्याय आहे

अनेक जिल्ह्यांतून आमच्या समाजांतील देव आंघोळीसाठी जागजई येथिल वर्धा नदी पात्रात रात्रीच्या वेळी येतात आणि पहाटे आंघोळी करून आपल्या गावोगावी परततात ही हजारो वर्षांपासून ची सामाजिक संस्कृतीची परंपरा आहे परंतु लोक प्रतिनिधी साधं आपलं तोंड सुध्दा दाखवतं नाही अनेक धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या परंतु या स्थळी साधा रस्ता सुध्दा तयार नाही ही वस्तुस्थिती आहे

आदिवासी समाजातील धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत लोकप्रतिनिधी नी लक्ष दिले पाहिजे ही भावना आदिवासी समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे सामाजिक आणि धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम लोक प्रतिनिधींचे आहे अशा राजकीय पुढाऱ्यांनी जर दुर्लक्ष केले तर येत्या निवडणुकीत यांना या समस्येला तोंड द्यावे लागेल असे मत मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी “‘ देव आंघोळ देवदर्शन”‘ करण्यासाठी आलेले भक्तांनी व्यक्त केलीय.