कृषी दुतांची कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी सूरज श्रीकृष्णा गोल्हर ,महेश रामदास भोयर, गोपाल श्रीकृष्णा वाशिमकर , सौरभ संजय वाळके व भिषेक रमेश जोगे यांनी यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितिला नुकतीच भेट दिली . या भेटी दरम्यान कापूस , तूर , दाळ , सोयाबीन , चणा अश्या अनेक शेत मालाला योग्य भाव मिळवून देण्याबाबत शेत मालाचा लिलाव कश्या प्रकारे केला जातो व धान्य कोठार संबंधित उत्पादित शेतमालास योग्य भाव मिळे प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोठारात मालाचा कश्या प्रकारे साठवण करून ठेवला जातो व त्या पावतीवर बँक च्या माध्यमातून कर्ज सोय उपलब्ध करून देण्या बाबत सविस्तर माहिती त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष यांच्या कडून घेतली . तसेच हा उपक्रम घेतांना ( प्राचार्य ) डॉ . आर.ए.ठाकरे, ( उपप्राचार्य ) एम . व्ही . कडू , कार्यक्रम अधिकारी प्रा . सौरभ महानूर व विषय शिक्षक प्रा .चेतन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.