
___________
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जळका येथे अवैध देशी व हातभट्टी दारूविक्री विक्रेत्यांवर राळेगांव पोलिसांनी दिं १ जुलै २०२२ रोज सोमवारला कार्यवाही केली असता २४ ४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या कार्यवाहीत जळका येथे शालीक चंद्रभा झाडे वय ४५ वर्ष याचे राहते घरी १८० एम एल क्षमतेचे देशी दारु संञाचे १२ पव्वे प्रत्येकी ७० रु.प्रमाणे ८४० रु.चा वीना परवाना अवैधरित्या विक्री करीता बाळगुन आले.तसेच शंकराच्या माळावर बंधाऱ्या जवळ नाल्याचे काठावर गोमा पाखरू काळे वय ५० वर्ष , उमेश गोविंदा पवार वय ४० वर्ष. रा.जळका यांचेवर धाड केली असता अनूक्रमे.२०० लिटर गावटी हातभट्टी दारु.गाळण्यास उपयुक्त असा मोहाचा सडवा. किमत.१०,००० रुपयांचा तसेच २८० लीटर गावटी हातभट्टी दारु.गाळण्यास उपयुक्त मोहाचा सडवा किमत १४००० रुपयाचा असा दोघांकडे एकुन २४८४० -/रु.चा मुद्देमाल मिळुन आला असून .सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने संजय चोबे पो.नि.राळेगांव यांचे मार्गदर्शनात मोहन पाटील पो,उप.नि.,पोहेकाँ.गोपाल वास्टर,नापोकाँ नीतीन गेडाम,रुपेश जाधव,विशाल कोवे,पोकाँ राजु शेंङे,संतोष मारबते यांनी पार पाङली
परंतु राळेगाव पोलीस स्टेशन चे अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये खुलेआम पणे देशी विदेशी दारू विकल्या जात आहे सदर देशी विदेशी दारू विकनाऱ्यांन कडून महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता राळेगाव पोलिसांना जात असल्याची चर्चा सूद्धा सुरू आहे.सदर या वरुन असे लक्षात येत आहे की हप्ता द्या अवैध धंदे चालू द्या हप्ता न दिल्यास कार्यवाही ला पुढे या अशी परिस्थिती सध्या या परिसरात सुरू आहे. यावरून असे लक्षात येते की महिन्याला लाखो रुपये हप्ता द्या अवैध धंदे चालू द्या अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झाली की काय ?
