स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य स्वातंत्र्य संगाम सैनिकाच्या कुटुबियांचा सत्कार (महसूल प्रशासनाने केला सन्मान)

राळेगाव तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर

तहसिल कार्यालय राळेगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी त्यांचा सन्मान केला.
स्वातंत्र्य संगाम सैनिक स्व. त्र्यंबक उर्फ दादा कृष्णराव राऊत यांचे पुत्र अशोकराव त्र्यंबकराव राऊत, राळेगाव
स्व. रघुविरसिंह गणपतसिंह गहलोत
यांचे पननातू कमलेशसिंह विलाससिंह गहलोत, राळेगाव
स्व. लक्ष्मणराव वडगाजी भटे
यांची सुन श्रीमती राधाबाई किसनराव भटे, राळेगाव स्व. यादवराव अन्नाजी दांडेकर यांचा मुलगा
बालाजी यादवराव दांडेकर रा. करंजी सो.
याचा या वेळी सन्मान करून त्यांच्या अतुलनीय कार्याला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे राळेगाव तालुक्याला असहकार चळवळ, भारत छोडो चळवळ या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची गौरवशाली परंपरा असल्याचे निदर्शनास आले.
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उदघाटन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.वृक्षारोपण करण्यातआले.
यावेळी दिलीप बदकी नायब तहसिलदार, नायब तहसिलदार एन.डी. बेंडे, पत्रकार महेश शेंडे, फिरोज लाखाणी, राळेगाव शहरातील कृष्णराव राऊळकर, भुपेंद्र कारीया, युसूभभाई सैय्यद,सतिष भटे,अशोक भागवत,गंगाधर घोटेकर,वाल्मीकराव मेश्राम, धनरे,श्रीमती उषाताई भोयर, छायाताई पिंपरे, शोभाताई इंगोले, दिक्षा नगराळे,प्रकाश खुडसंगे, वर्मा सर्व पटवारी व कर्मचारी, उपस्थित होते.