
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
देशात समता नांदवा! ग्राम जयंतीचा मंत्र देवु नवा “‘ हे राष्ट्रसंताचं क्रांतीकारी ब्रिद वाक्य मनातल्या मनात गुण गुणाव लागतं आहे ही खंत आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिसून येत आहे. अशी भावना जनमानसात दिसून येत आहे.
“‘ झुठी गुलामशाही क्यों डर बता रही है”‘ स्वातंत्र्य,समता, बंधुता, या ऐवजी व्यभिचार, भष्टाचार, आणि अत्याचार, द्वेष आणि छलकपट या विकृत पद्धतीने सामान्य माणसावर परीणाम होतं आहे हा कर्करोग मानवतावादी लोकशाही ला झाला की काय? अशी शंका निर्माण झाली आहे मानसातली माणुसकी संपुण मानवतावादी लोकशाही मध्ये राजकीय सत्तेचा माजं म्हणून तानाशाही आणि मुघलाही सुरू आहे यांचे परीनाम सामान्य माणूस भोगतो आहे हे आमचं दुर्दैव आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा क्रांतीकारी विचार गुलामगिरी नष्ट करण्यासाठी होता त्यांचा जन्म दिवस “‘ग्रामजयंती”‘ म्हणून साजरा व्हावा यासाठी जनमताचा कौल होता परंतु या देशातील सरकार आणि राजकीय पुढारी विसरत आहे.सत्ताधारी सरकार विसरत आहे ही खंत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भजनाच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंतीनिमित्त प्रतिमा चे पुजन करून सामुदायिक प्रार्थना करुन जयती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने उपस्थित मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, प्रल्हाद काळे, नितीन ठाकरे, कृष्णा भोंगाडे, अशोक कपिले, विठ्ठल धुर्वे, विनोद पराते अशोक मंगाम, दिलीप मेश्राम, गजानन झाडे, श्रीधर ढवस, सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांला प्रेरित असनारे यांच्या उपस्थितीत “‘ग्रामजयंती”‘ साजरी करण्यात आली आहे.
