
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ तालुका राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर ते दिनांक 28 डिसेंबर 2025 ला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराचे प्रांगणात तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न .
या महोत्सवामध्ये दैनिक ग्रामसफाई सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना ग्रामगीता वाचन भजन कीर्तन प्रवचन व समाज उपयोगी प्रबोधनपर व रचनात्मक उपक्रम संपन्न. दिनांक 26 डिसेंबर शनिवारला सकाळी नऊ वाजता महोत्सवाचे उद्घाटन व झेंडावंदन जानरावजी गिरी राळेगाव यांचे शुभ हस्ते संजयजी घीया राळेगाव यांचे अध्यक्षतेखाली प्रदीपभाऊ ठुणे,प्रतिकभाऊ बोबडे सुनीलभाऊ भामकर मनीष काळे राळेगाव ,प्रकाश गोंडे नागपूर गोविंदराव झोड उमेशभाऊ भोयर नागठाणा यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर दुपारी बारा वाजता गुरुदेव सेवा मंडळ परसोडी यांचे खंजिरी भजन सायंकाळी आठ वाजता खुशाल वैद्य व संच नागपूर यांचा रंगीत व संगीतमय श्री संत एकनाथ महाराजांचे भारुड दिनांक 27 डिसेंबर शनिवारला दुपारी अकरा वाजता कलावंत मार्गदर्शन व सन्मान सोहळा एडवोकेट शाम खंडारे संस्थापक अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली सिद्धार्थ भवरे राज्य उपाध्यक्ष राजेश मडावी मुरलीधर धनरे प्रमोद बाकडे उज्वला बहाळे वंदना मूर्खे यवतमाळ सुनील गोंडे पुसद प्रकाश गोंडे नागपूर चंद्रकला उराडे वणी वंदना कुटे सुधीर चौधरी, सय्यद युसुफ अली मधुकर गेडाम कृष्णराव राऊळकर राळेगाव अशोक भेंडाळे केळापूर यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर संपन्न .
यामध्ये प्रथम श्री गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ वरुड यांचे खंजिरी भजन शारदाताई आत्राम परसोडी यांचे गायन विलासराव गोडे केळापूर यांचा पोवाडा राजेश मडावी यवतमाळ यांचा नाकाने बासरी वादन रमेश वाघमारे यवतमाळ ज्येष्ठ शाहीर यांचा कार्यक्रम अनेक कलावंतांनी आपले कलेचे प्रात्यक्षिक प्रदर्शन केले पूर्व विभाग यवतमाळ जिल्हा कार्यकारणी सर्व सदस्यांचा शेला पुष्पगुच्छ कलावंत ओळखपत्र व राळेगाव कळम तालुक्यातील तालुका समितीच्या सदस्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला .या मेळाव्याला नऊ तालुक्यातील प्रतिनिधी व राळेगाव तालुक्यातील एकूण पाचशे कलावंत उपस्थित होते. सायंकाळी आठ वाजता ह भ प आकाश टाले व संच नागपूर सप्त खंजिरी वादक यांचे ग्रामगीतेवर राष्ट्रीय कीर्तन संपन्न .दिनांक 28 डिसेंबर रविवारला सकाळी नऊ वाजता तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा 37 भजनी मंडळ सहित दुपारी बारा वाजता ह भ प ज्ञानेश्वर रोकडे महाराज कळम यांचे काल्यावर कीर्तन सर्व भजनी मंडळ प्रमुखांचा मानपाण पाहुण्यांचे शुभहस्ते व समारोप डॉक्टर ज्ञानेश्वरराव मुडे यांचे अध्यक्षतेखाली वाल्मीक मेश्राम भगवान धनरे सुधीर चौधरी एडवोकेट प्रफुल भाऊ मानकर अरविंद भाऊ वाढोणकर अंकुश मुनेश्वर चिडे भाऊ विलासराव भोयर डॉक्टर कुणाल भोयर वंदनाताई कुटे छायाताई गराड पुनीत मातकर प्रमोद बाकडे प्रमोद घोटेकर प्रकाश गोंडे सुनील गोंडे विवेक गोंडे अरुण गोंडे प्रफुल उघडे यांचे उपस्थितीत संपन्न. शोभा यात्रे मध्ये घोडे व विविध सदतीस भजनी मंडळाचे प्रात्यक्षिक व तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांची वेशभूषा हे विशेष आकर्षण होते.तसेच 1000 कलावंतांची उपस्थिती होती तीन वाजता महाप्रसाद व राष्ट्रवंदनेने सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर घोटेकर जीवन प्रचारक गु से म प्रास्ताविक विलास निम्रण मुख्याध्यापक लखाजी महाराज विद्यालय झाडगाव व आभार प्रदर्शन अखिल धांदे सदस्य ग्रामपंचायत गुजरी यांनी केले.
