
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 3 मार्च रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे शाळेच्या पटांगणात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला…संयुक्त राष्ट्र संघटनेने 2013 या सालापासून हा दिवस सुरू केलेला आहे…वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो…यावर्षी त्यांनी वन्य प्राणी रक्षण व त्यासाठी गुंतवणूक ही थीम ठेवलेली आहे…वन्य प्राण्यांचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी आर्थिक गुंतवणूक व आपला वेळ देणे गरजेचे आहे…कारण त्यांच्या अस्तित्वावर मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे…आधुनिक काळामध्ये मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे वन्यजीव धोक्यात आलेले आहेत… जंगले तोडली जात आहे..विविध प्राण्याची शिकार केली जात आहे,पाण्यावाचून अनेक जीव मरत आहेत… दिवसेंदिवस मानव त्याचा अधिवास संपवत आहे,यामुळे अनेक प्राणी नष्ट होत आहे… हा निसर्ग सर्वांचा आहे… परंतू सध्या सर्व विकास मानवकेंद्री झाल्यामुळे इतर सजीव धोक्यात आलेले आहेत…यामुळे मानव देखील धोक्यात आहे…यामुळे या आजपासुन आपण सर्वजण आपली निसर्गाविषयी असलेली जबाबदारी स्वीकारू व या निसर्गाचे रक्षण, lसंवर्धन, संगोपन करण्यासाठी पुढाकार घेऊ येणाऱ्या पावसाळ्यात एक झाड लावू आणि जगवू आपल्या पुढील पिढीला……
कार्यक्रमाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण व जंगल संवर्धन याविषयी वैज्ञानिक माहिती देण्यात आली.विज्ञान शिक्षक संदीप सुरपाम यांनी अन्नसाखळी व त्याचे मानवी जीवनात महत्व हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, निसर्गाचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून महत्त्व लाकडे सर यांनी कथन केले, तागडे सर यांनी वाघ व राजा याची बोधकथा सांगून जंगल तोडीचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला, नरडवार सर यांनी जादव पायेंग( मुलाई) फारेस्टर या व्यक्तीने ब्रम्हपुत्रा नदीच्या बेटावर फार मोठे जंगल विकसित केले ज्याठिकाणी हत्ती सुद्धा वास्तव्यास आहे, ज्या जंगलात हत्ती असेल ते जंगल विकसित जंगल असते अशी माहिती त्यांनी दिली…
मुख्याध्यापक राजेश शर्मा व पेंदोर मैडम यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
