
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती राळेगाव अंतर्गत वरध येथील नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या अंगणवाडी केन्द्रांचे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन वरध गावचे सरपंच मा. श्री. निलेशभाऊ रोठे तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री.सागर विठाळकर सर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव, मा. श्री विश्वकर्मा शिवनकर सर विस्तार अधिकारी राळेगाव, पर्यवेक्षीका कु.पायल आत्राम मॅडम, तालुका समन्वयक श्री रुपेश रेंगे,ग्रामपंचायत अधिकारी श्री दुधकोहळे साहेब, वरध ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री ज्ञानेश्वरजी डोफे ,तानाजी महाकुलकर, अंगणवाडी सेविका कल्पना महाकुलकर व सर्व वरध बिट अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती च्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली, तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले,आदिवासी बहुल भागामध्ये अतिशय सुंदर इमारत बांधली याचा फायदा निश्चितच वरध येथील छोट्या छोट्या बालकांना व लाभार्थींना होईल असे प्रतिपादन सागर विठाळकर यांनी केले, तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीच्या दरमहा सभा घेऊन मार्गदर्शन करावे अशा सुचना दिल्या,कार्यकमाचे अध्यक्ष निलेश रोठे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका यांना पुढील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या, यावेळी शिवनकरसर व रुपेश रेंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना बुद्धेवार तसेच प्रास्ताविक मिराबाई दासपतवार व पर्यवेक्षीका पायल आत्राम यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरध बिटच्या सर्व अंगणवाडी सेविका सर्व मदतनीस यांनी खुप प्रयत्न केले.
