वन विभागाने दिले जखमी माकडाला जीवनदान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस येथील वडवाला जिनमध्ये एका माकडाला करंट लागून माकड जखमी असल्याचे माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली. तेव्हा वन विभागाची टीम थोडासाही विलंब न करता तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमी माकडाला शिताफीने पकडून उपचार करण्यात आले.जखमी माकडाला वन विभागाने एका प्रकारचे जीवनदान दिले.

माकडाला करंट लागून माकड जखमी झाल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले असता त्यात प्रज्योत आरगडे यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून एक माकड जखमी असल्याचे माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांना दिली.
असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पि.के.जाधव,वनरक्षक संतोष बदुकले, संतोष ठाकरे,प्रवीण भगत, देवराव धनगर यांनी तातडीने वडवाला जीन येथे घटनास्थळी दाखल होऊन जखमी असलेल्या माकडाला शिताफीने पकडून उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमंत सातपुते यांच्याकडे आणून उपचार करण्यात आले.सदर माकडाचे उपचार करून वनविभागाच्या मोलाच्या सहकार्याने माकडाला जीवनदान मिळाल्याने विभागाचे सर्वनागरिकाकडून कौतुक होत आहे.