आर्णीमध्ये मनसेने दिले पेट्रोल १५रुपयांनी स्वस्त मनसे वर्धापनदिनानिमित्त मनसेची वाहनधारकांना अनमोल भेट

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी

.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मनसे आर्णी पदाधिकाऱ्यांनी वाहनधारकांना पेट्रोल नियमित भावापेक्षा १५रूपयांनी स्वस्त देवुन अभिनव भेट दिली मनसेच्या याअभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना महामारीने अगोदरच सर्वसामान्यांचे अर्थचक्र बिघडले अशातच पेट्रोल ,डिझेल च्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले केंद्र सरकार व राज्य सरकार पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी तु तु मै मै करीत असतांना अशातच नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी अग्रेसर असणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेने मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात मनसेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन वाहनधारकांना पेट्रोल १५रुपयांनी स्वस्त देवुन आपला सामाजिक उपक्रम तर राबविलाच शिवाय पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्याच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या चालढकल पणाचा निषेध सुद्धा केला. वाढत्या महागाईच्या काळात मनसेच्या वतीने शहरातील जाधव पेट्रोल पंपावर पेट्रोल १५ रुपयांनी स्वस्त मिळत असल्याची माहिती होताच जवळपास हजारो वाहनधारकांनी या महागाईच्या सुवर्ण संधीचा लाभ घेतला.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार,मनविसे तालुकाध्यक्ष संदिप गाडगे,मनसे शहराध्यक्ष कपिल ठाकरे,दिपक बोरकर, राजेश कांबळे, अरविंद मस्के,अनिकेत पंडीत, ओम राऊत, प्रशांत चव्हाण, शिवम पळकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी