
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
इयत्ता दहावीत त्याला ३५ टक्के मिळाले.तसा तो शालेय अभ्यासात हुशार मात्र हलाकीची परिस्थिती आणि अभ्यास यांचा मेळ काही जमेना.घरी दोन लहान भावंडं,आई ,वडील असा परिवार शिवाय भूमिहीन कुंटुंब ,दारिद्र जणू पाचीलाच पुंजलेले,आणि यातही चंदू उभा राहिला आणि सुरु झाला एका यशस्वी युवा उद्दोजकाचा संघर्षमय व तितकाच प्रेरणादायी प्रवास.
भूमिहीन सामान्य कुटुंबातील चंदू , अर्थात चंद्रकांत दोंडे यांचा प्रवास राज्यभरातील युवकांसाठी प्रेरणादायी संजीवन आहे.
दहावीत शिकत असताना कुटुंबाला हातभार लावणे हे महत्वाचे होते,यासाठी शेती कामाला जाणे,लोकांचे फ्रिज,कुलर इ.उपकरण दूरस्थ करून आपली उपजीविका करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतानाच आपण या क्षेत्रात आयटिया करावा असा विचार मनात आला.दोंडे हे माध्यमिम शाळेत असताना सुट्टी झाल्यानंतर बाहेर दुकांनासमोर तासंतास उभे राहायचे,उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामाचे निरीक्षण यावेळी ते करत असत.
इयत्ता दहावी नंतर विखे फाऊंडेशन ला नगर येथे आयटीआय ला प्रवेश घेण्याचे ठरले,यासाठी पाचशे रुपये जमविण्यासाठी कष्ट झेलावे लागल्याचे ते सांगतात.नंतर आयटीआय ला प्रवेश झाला मात्र घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे विस्कटली होती.त्यामुळे नगर येथे शिक्षण घेत असतानाच एका हॉटेल मधील कामासह ,ईपीट्रॉन कंपनीत रात्रपाळी करून काम केले.या सर्व आघाड्यांवर कसरत करत असतानाच रात्री झोप हि होत नसे मात्र काहीतरी वेगळं करू अशी धडपड सदैव होती आणि तीच माझ्याकरिता प्रेरणा ठरत असावी असे दोंडे सांगतात.महाविद्यालयाच्या कॅपप्स निवडीच्या च्या माध्यमांतून पुण्याला ईपीट्रेड कंपनी अंतर्गत दीपाली नामक कंपनीत गेल्यानंतर सुरुवातीला तीन हजार रुपये पगार होता.पुण्याहून चंद्रकांत दोंडे गावाकडे यायचे आणि आपल्या घरची परिस्थिती पाहून निराश होत असत,आई रंजना संभाजी दोंडे, भाऊ बाळासाहेब व विशाल दोंडे रोजनंदारी वर मिळेल ते काम करत असत.काही कारणास्तव पुण्याची नोकरी सोडली व हि स्वारी गावात दाखल झाली.परिस्थिती जैसे थेच.!
नैराश्याचे ढग आता दाटून आले होते.दोंडे सांगतात जगण्याच्या लढाईत अनेक काम केली,चूल पेटायची असेल तर कामाला पर्याय नाही असे ते सांगतात.या दरम्यान पुण्याहून अनेकदा बोलावनही आला पण पगार कमी व आत्मसन्माचा अभाव यामुळे त्याकडे पाठ फिरवली. कोल्हार ला आपल्याला पहिलं काम मिळाल्याचं दोंडे सांगतात.
कोल्हार येथे वातानुकूलित यंत्र ,फ्रिज,कुलर रिपेअरिंग चे काम केले.
त्यानंतर राहुरीला श्री. दुसाने यांच्याकडे काम केले.मालकाच्या हाताखाली काम करत असतानाच आपल्या प्रेमळ स्वभावामुळे व कामावरील श्रद्धेमुळे दोंडे यांचा ग्राहक वर्गाशी जिव्हाळा निर्माण झाला.एक दिवस दुकानावरील काम संपल्यानंतर सायंकाळी राहुरी कृषी विद्यापीठातील एका साहेबांच्या घरी AC रिपिअरिंग चे पहिले काम दोंडे यांना मिळाले,जीवनात आपल्याला स्वतःला पाहिलं मोठं काम मिळालं याचा आनंद झाला मात्र माझ्याकडे कामासाठी साधी पक्कड व स्कु ड्रायव्हर सुद्धा नव्हता असे दोंडे सांगतात.यावेळी त्यांनी फिरोज पठाण या मित्राकडून हे साहित्य मिळविले.चंद्रकांत दोंडे यांना या कामाचे १२०० रुपये भेटला,मला झालेला आनंद शब्दात व्यक्त करता न येणारा आहे अशी प्रतिक्रिया ते देतात.त्यावेळी दोंडे यांची वय १५वर्षे होत.राहुरी ला दोन वर्षे काम करून तेही काम सोडल.आणि सुरु झाला सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला चंदुचा युवा उद्दोजक चंद्रकांत दोंडे होण्याचा संघर्षमय प्रवास.त्यांच्या प्रामाणिक कामामुळे त्यांना छोटी-मोठी काम भेटत गेली.फोन नसल्यामुळे देवळाली येथील एका टपरीवर कुणाच काही काम असेल तर त्याचा निरोप मिळत असे,सायकल वर साहित्यासह प्रवासाची आठवण आजही येते असे दोंडे आपला प्रवास व्यक्त करताना सांगतात.या सर्व संघर्षातून वाट काढत आज दोंडे यांनी नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे भाडे तत्वावर दोन खोल्या घेतल्या असून येथून ते आपला विशाल एअर कंडिशनर या नावाने चालणारा व्यवसाय स्वतः मॅनेज करतात.विशेष म्हणजे त्यांची सेवा नगर जिल्ह्यात देवळाली भागात सुरु असून त्यांच्याकडे संध्या पाच कर्मचारी काम करतात.जिल्ह्यामध्ये आज विशाल एअर कंडिशनर ने चांगले नाव प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर प्रस्थापित केले आहे.चंद्रकांत दोंडे यांचे या व्यवसायातून वार्षिक उत्पन्न १२ लाखांच्याही पुढे गेले आहे.आपल्या कर्तव्याप्रति निष्ठा व स्वतःवर विश्वास असेल तर सामान्य कुटुंबातील तरुण देखील आपल्या ज्ञानाच्या व मेहनतीच्या जोरावर व्यवसायात आपल अस्तित्व निर्माण करू शकतो हे दोंडे यांनी अधोरेखित केले आहे.आजच्या तरुणाईसाठी चंद्रकांत दोंडे हे प्रेरणादायी ठरतात.
