मुकींदपूर ग्रामपंचायतीवर एकता ग्राम विकास पैनलचा वरचष्मा

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


मुकींदपूर ग्रामपंचायत या वर्षी खूप चुरशीची झाली.उमेशभाऊ ठाकरे यांचे एकता ग्रामविकास पैनल आणि राजेशभाऊ दिघोरे यांचे एकता परिवर्तन पैनल यांच्यात लढत झाली.दोन्ही पैनलच्या ०२/०२ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.०३ जागेसाठी निवडणूक झाली.
वॉर्ड नं.२मध्ये मुख्य लढत एकता परिवर्तन चे राजेशभाऊ दिघोरे व एकता ग्रामविकास चे सनीभाऊ भवरे यांच्यात झाली,त्यामध्ये सनीभाऊ भवरे विजयी झाले.
गावाचा विकास हाच मुद्दा समोर असेल असा विश्वास उमेशभाऊ ठाकरे(पैनल मार्गदर्शक)सुरेश हजारे(ग्रा.पं. सदस्य)गजानन तलांडे,सनी भवरे,सुरेखा ठाकरे ग्रा.पं. सदस्य यांनी व्यक्त केला आहे.
प्रामुख्याने सदानंद ठाकरे(माजी सरपंच),भीमराव भगत(माजी उपसरपंच)अमोल भवरे,संजय नगराळे,शिलभूषण भवरे,तेजस लसवंते(तालुकाध्यक्ष:आदिवासी छात्र संघ), पवन वाघमारे,रविकांत गवळी,विनोद भवरे आदी उपस्थित होते.