भंडारी (शी) येथे गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी

भंडारी(शि.)येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच समाज प्रबोधन होण्याकरिता भागवत सप्ताहाचे आयोजन केले.त्या माध्यमातुन समाज जागृती होण्यास मदत होण्याची अपेक्षा बाळगुन सर्व परिश्रम गणेश बोटरे,शंकर ठाकरे,गोलु मुंडे,राहुल ठवकर,प्रशांत ठाकरे,प्रशांत मुंडे आदींनी परीश्रम घेतले. मद् भागवत सप्ताह ऐकण्याचा आनंद सर्व गावकरी मंडळीनी घेतला.त्या सोबतच महराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. अशी माहिती ग्रा.पं. सदस्य श्री.मोहनभाऊ ठाकरे(मनसे युवा नेते-बोरगाव सर्कल) यांनी दिली.