
प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी
आर्णी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच जागा या निवडणूकी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढविनार आहे.तसे आदेशच तालुकध्यक्ष सचिन यल्गन्धेवार यांनी दिले आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक् जि.प. सर्कल ची जबाबदरी तालुका उपाध्यक्षांना व सर्कल अध्यक्ष यांना दिली आहे.त्या पैकी जवळा – लोणी सर्कलची जोरदार चर्चा सुरू आहेत. (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)मनसेचे नेते सुरजभाऊ राठोड. आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी निवडणूक तोंडावर असतांना मोठ्या प्रमाणात भेटीगाठी कार्यकर्त्यां बरोबर सुरू केली आहे दररोज. गावा – गावात जोरदार एन्ट्री करीत गावातील आपल्या सर्कल मधील लोकांच्या अडचणी जाणून घेत आहेत जाणून घेत आहेत सूत्रांच्या माहिती नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक श्री राज साहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते आहेत असे मानले जाते. सध्या श्री सुरजभाऊ राठोड यांच्या नावाची सर्वत्र आर्णी तालुक्यातील जिल्हा परिषद जवळा लोणी सर्कल मध्ये मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून चर्चेत आहेत श्री सुरज भाऊंचे नांव असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.त्या बरोबरच जि.प.सर्कल ची जबाबदारी किशोर बोक्से(सर्कल अध्यक्ष),जवळा-लोणी सुरज राठोड(तालुका संघटक), सुकळी-देऊरवाडी(बु.)जि.प.सर्कल ची जबाबदारी चंदन भगत यांच्या कडे सोपविन्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष राजू उम्बरकर,जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे (मनविसे जिल्हाध्यक्ष) तालुकाध्यक्ष सचिन यल्गन्धेवार ,शहराध्यक्ष कपिल ठाकरे,तालुका सचिव भूषण पाटील व तालुका उपाध्यक्ष चंदन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरु आहे.असे तालुकाध्यक्ष सचिन यलगन्धेवार यांनी कळविले आहे.
