
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी
आर्णी येथील व्यापारी श्री. योगेशभाऊ राठोड यांची नियुक्ती मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी मा.राजुभाऊ उंबरकर(प्रदेश उपाध्यक्ष)यांच्या आदेशाने केली.
योगेश राठोड यांनी केलेली सामाजिक कार्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना व्यापारी सेनेच्या शहराध्यक्ष पदि निवड करून त्यांच्या कामाची पावती त्यांना बहाल केली आहे.व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी त्यांना या महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले आहे.
या निवडीचे श्रेय त्यांनी अनिल हमदापुरे (जिल्हाध्यक्ष,मनविसे)सचिन यलगंधेवार(तालुकाध्यक्ष मनसे)यांना दिले.
या निवडीचे स्वागत संदीप गाडगे(तालुकाध्यक्ष, मनविसे)कपिल ठाकरे(शहराध्यक्ष,मनसे)चंदन भगत(तालुका उपाध्यक्ष,मनसे) व भूषण पाटील(तालुका संघटक,मनसे)दीपक बोरकर(सर्कल अध्यक्ष,मनसे)यांनी केले आहे.
