नगरसेवक निलंकुशभाऊ चव्हाण यांच्या प्रयत्नाला अखेर यश

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन असामान्य असे समाज कार्य करणे अशी जिद्द बाळगणारे जनतेचे सेवक,आर्णी नगरपरिषदचे कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री निलंकुशभाऊ चव्हाण यांच्या सतत पाठपुराव्याला आज अखेर यश आले खरंच भाऊ आपण सतत आर्णी नगरपरिषदच्या विविध आंदोलनांपैकी विशेष कामगिरी म्हणजे भाऊंच्या प्रयत्नामुळे आर्णी नगरपरिषद हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी CCTV बसवण्या करिता आज मंजुरात मिळाली व त्याच बरोबर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. जवळपास18,51,741 रुपये मंजूर झाले,या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे खूप-खूप अभिनंदन व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक म्हणजे निलंकुश भाऊ,हे नेहमी जनतेची कामे करण्यातच स्वतःला रमून घेतात.
शहरातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मंडळींनी जनसेवक निलंकुश भाऊ यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
दिल्या आहे.
सर्व स्तरांतून भाऊंचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी