उमेदवारांचे आरक्षण सोडती कडे लक्ष

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या कष्टाने निवडून आलेल्या उमेदवारांचे आत्ता सरपंच पदाच्या आरक्षणा कडे लक्ष लागले आहे.
प्रत्येक वॉर्ड मेंबर ला वाटत आहे की,आपणच सरपंच होणार या अविर्भावात जणू सर्वच मेंबर वावरतांना आढळून येत आहेत.
प्रत्येकाला सरपंच पदाचे डोहाळे लागले आहे.ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहण्यासाठी सरपंच पद अतिशय महत्वाचे समजल्या जाते,त्यामुळे सगळेच जण आपापल्या परीने प्रयत्न करतांना दिसत आहे.
निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत 2 फेब्रुवारी पुरुषांकरिता व 4 फेब्रुवारी महिलांकरिता ह्या दोन तारखा ठरविल्या आहेत.
तालुक्यामध्ये यावर्षी जवळपास सर्वच ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक चुरशीची ठरली.त्या प्रमाणामध्ये मतांची टक्केवारी सुद्धा वाढली.
सर्व सुज्ञ मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यास मदत केली.
आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनी कर्तव्य पार पाडले.गावातील नागरिकांचे सुद्धा आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी