
प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी.८६९८३७९४६०
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरूवात केली, असून या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून मनसेनं आता आर्णी साठी मोहिम सुरु केली आहे. प्रथमच मनसे ने ग्रामीण भागात आपले पाय रोहले आहे आता झालेल्या ११ ठिकाणी मनसेचे ग्रामपंचायत मध्ये सदस्य निवडून आले त्याच प्रमाणे शिरपूर गावात ७ पैसे की ६ सदस्य निवडून आले. सरपंच हे मनसेचा झाला हा विषयाची चर्चा हि महाराष्ट्र लेवल ला झाली हा फायदा हे त्यांना आगामी निवडणूकीत यांचा फायदा होणार हे निश्चित.आगामी निवडूका हे स्वबळावर लढवणार आहे, अशी मागणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार व तालुकाध्यक्ष सचिन यलगंधेवार यांनी दिली दरम्यान आर्णी नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीची तयारी मनसेनं सूरू केली आहे. जवळा सर्कल,बोरगाव सर्कल, देऊरवाडी(बु.) सर्कल,सावळी सर्कल व आर्णी शहराला जिल्हा अध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी भेटी दिल्या ५ वर्षात जे कामे मनसे ने केले ते जनतेसमोर घेऊन जाणार तसेच विकासासाठी ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहे,अशी माहिती तालुकाध्यक्ष यांनी दिली.
