आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदत सुपूर्त

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी ८६९८३७९४६०

आर्णी तालुक्यामधील मुकिन्दपुर या गावी काही दिवसांपूर्वी भगवंता हेंगाडे (वय अन्दाजे३४) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली.या घटणेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.आत्महत्या करणारे श्री.भगवंता यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मुले,पत्नी,आई इत्यादी आप्तजन आहेत.जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी स्वतः दिवाळी च्या अगोदर २९,५००₹ चा चेक आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला सुपूर्द केला.बाकी ७०,५००₹ लवकरचं जमा होईल, त्यामुळे या कुटुंबाला दिवाळीआधी मदत केल्याची चर्चा परिसरात आहे .तालुक्याचे तहसीलदार मा.भोसले साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते.गावचे पोलीस पाटील विलास राऊत, सरपंच योगिता सुरेश हजारे,गावातील मंडळी यांच्या सहकार्याने कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली,अशी भावना प्रतिष्ठीत नागरिक सुरेश हजारे यांनी व्यक्त केली व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाभाऊ पावडे यांनी सर्वांचे आभार मानले.