कारेगाव येथे मोठ्या उत्साहात गणराज्य दिन साजरा

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


आर्णी तालुक्यातील कारेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
२६नोव्हेंबर१९४९ मध्ये भारतीय राज्यघटना लिहून तयार झाली होती.ती संविधान सभे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केली. त्यावर बरीच चर्चा होऊन २६ जानेवारी या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन त्याच दिवशी राज्यघटना लागू करण्याचे ठरवण्यात आले.कारण की प्रथमतः त्याच दिवशी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेस ने एकमताने संमत केला होता.त्याच दिवसाचे महत्व लक्षात घेऊन २६जानेवारी १९४९ राज्यघटना संपूर्ण देशात लागू करण्याचे ठरवण्यात आले.
घटना समितीने राज्यघटना संमत करून अंमलबजावणी करण्याचे एकमताने मंजूर केले.व त्यानुसार देशाचा राज्यकारभार सुरळीत चालू झाला.
७४वा गणराज्य दिन कारेगाव मध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.
जि. प.प्राथमिक मराठी शाळा, कारेगाव येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी