
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूका यावर्षी अटीतटीच्या झाल्या,त्यांपैकी मुकींदपूर ग्रा.पं. ची निवडणूक सुद्धा खूप चुरशीची झाली.
एकता ग्रामविकास व एकता परिवर्तन पैनल यांमध्ये खूप जोरदार रंगतीची लढत झाली.
त्यामध्ये एकता ग्रामविकास पैनलने ०७पैकी ०४ सदस्य निवडून आणले आणि एकता परिवर्तन पैनल ने ०७ पैकी ०३ निवडून आणले
एकता परिवर्तन पैनल ने खूप प्रयत्न करून ०३ सदस्य निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली. दोन्ही पैनलने खूप प्रयत्न करून आपापले वर्चस्व सिद्ध केले.
एकता ग्रामविकास पैनलने ०४ सदस्य निवडून आणत सरपंच पदी योगिता हजारे व उपसरपंच पदी सनी भवरे यांची निवड केली.
नवनियुक्त सरपंच व उपसरपंच
यांनी गावाच्या विकासा करीता प्राधान्य देण्याचे नमूद केले आहे.
गावातील व्यक्तींकडून यांच्या निवडीचे मोठया प्रमाणात स्वागत होत आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
