मनसे आर्णी ने अडविली बस

तालुका प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी (८६९८३७९४६०)

राज्य भरात बस कर्मचारी संपावर असताना यवतमाळ डेपो ने ०४ गाड्या सोडल्या परंतु मनसे आर्णी च्या वतिने आर्णी आलेली ०१ गाडी परत पाठवून बस कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यात आला. त्यावेळी आन्दोलन करतांना मनसे तालुकाध्यक्ष सचिन यलगन्धेवार, शहराध्यक्ष कपिल ठाकरे,तालुका उपाध्यक्ष चंदन भगत, मनविसे शहराध्यक्ष अरविंद मस्के,ओम राऊत,विकास ठमके,अनिकेत पंडीत आदी पदाधिकारी उपस्थित होते. आर्णी तहसील समोर हे आंदोलन चालू असतांना बस मधील प्रवाश्यांना खाजगी वाहनाने जाण्याची सोय मनसे पदाधिकारी यांनी करून दिली. बस चालकाने वाहतुक नियंत्रका मार्फत ठाणेदार जाधव साहेब,आर्णी यांना कळवताच ते ताफा घेऊन आले व बस स्थानकामध्ये नेण्यात आली.