आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी कोविड१९ रूग्णांसाठी प्रत्येकी १०बेड उपलब्ध करून द्याव्या-सचिन यलगंधेवार (तालुकाध्यक्ष मनसे

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


कोविड१९ हा अतिशय जीवघेणा रोग आहे.त्या रोगाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्याकरिता शासनाने आर्णी तालुक्यातील भंडारी येथे कोविड१९ साठींच्या रुग्णांकरिता विलगिकरण कक्ष व उपचार केंद्र स्थापन केले आहे.
कोविड१९ ची तिसरी लाट ही अत्यंत भयावह असल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
रूग्ण संख्या वाढत आहे.त्यामुळे रुग्णांच्या प्रमाणात बेड्स ची उपलब्धता नाही.
तसेच मनसेच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवून तालुक्याच्याच ठिकाणी कोविड१९ रुग्णालय उभारावे अशी मागणी सुद्धा केली आहे.
कोविड१९ रुग्णालयात बेड्स आहेत.त्याचा तालुक्यातील सर्वच रुग्णांना फायदा होत आहे परंतु आर्णी तालुका हा खूप मोठा असल्यामुळे रुग्णांच्या प्रमाणात बेड्स उपलब्ध नाहीत त्यामुळे आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी प्रत्येकी १० बेड उपलब्ध करून देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिनभाऊ यलगंधेवार यांनी केली आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी