प्रोफेशनल टीचर असोसिएशनची तालुका कार्यकारिणी गठीत

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा


जिल्हा प्रोफेशनल टीचर असोसिएशन या खासगी शिकवणी घेणार्‍या संघटनेने केळापूर तालुका कार्यकारिणी यवतमाळ येथे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष पदी सागर लहामगे, उपाध्यक्ष पदी अमृत वानखेडे, सचिव पदी धीरज येलचलवार, सहसचिव पदी सचिन शिरपूरकर, कोषाध्यक्ष रितेश मुप्पीडवार, प्रसिद्धी प्रमुख सतीश राऊत, मुख्य सल्लागार राजेश सोनुले, सदस्य सुनील केरवतकर, वैभव गुरनुले यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगिराज अरसोड, जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हाउपाध्यक्ष शैलेश दुबे, जिल्हा संघटक मोहनसिंग शेर आणि पांढरकवडा येथील शिकवणी क्लास संचालक उपस्थित होते.