
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका पूर्ण ताकदीने लढणार आहे.
मराठी हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सर्व मनसे च्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष यांना पत्राद्वारे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा आदेश जारी केला आहे.
त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना,भाजप,वंचित अश्या सर्वच पक्षांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे,असे आढळून येत आहे.
सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे आढळून येत आहे.
जिल्हास्तरीय नेते व तालुकास्तरीय पदाधिकारी प्रचंड मेहनत घेतांना दिसत आहे.
मनसे ला ग्रामीण भागात पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे समोरील जि. प. व पं. स. च्या निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चित फायदा होईल असे,मनसे तालुकाध्यक्ष सचिन यलगंधेवार व शहराध्यक्ष कपिल ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी
