यवतमाळ येथील आनंद नगर वेदधारनी मंदिर च्या रस्त्याचे मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या उपस्थितीत केले रस्ता भुमीपुजन….!

!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ येथील आनंद नगर वेदधारनी मंदिर जवळ च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आज भुमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा.आ.मदनभाऊ येरावार मा.रीता गजानन घावतोडे नगरसेविका मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच उपस्थित होते

आदरणीय आमदार मदनभाऊ येरावार यांच्या विकास निधीतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रभाग तेविच्या नगरसेविका सौ.रीताताई गजानन घावतोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

रस्ता भुमीपुजन करतांना मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी प्रत्यक्ष कुदळ मारुन उद्घाटन केले आहे.तुकड्या ची झोपडी या स्मरणिका साठी शुभेच्छा पत्र देण्याचे आश्वासित केले आहे.लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी काम सुरू होईल असं मत व्यक्त केले आहे कार्यक्रमाला उपस्थित गजानन घावतोडे कीशोर लोनकर दिपक फाले राजु गोहणे योगेश अडाणे पिंटु खोब्रागडे हांडे मंडकमाळे आनंद नगर परीसरातील महिला भगिनी आणि युवक उपस्थित होते.