
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शहीद दिवस साजरा व जागतिक हवामान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. व्ही. आगरकर व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख मा. प्रा. व्ही. डी. समर्थ व भूगोल विषयाचे मा. प्रा. मनीष बावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर यांनी विध्यार्थ्यांना भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या बालीदानाविषयी माहिती सांगितली. भूगोल विषयाचे प्रा. मनीष बावणे यांनी जागतिक हवामान दिनानिमित्त हवामानाचे महत्व, हवामान अनुकूल राहण्यासाठी काय दक्षता घ्यावी, कोणकोणत्या योजना करायला हव्यात याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील गोरे यांनी केले. कार्यक्रमाला रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुनाली कुमरे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल लिहितकर व सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रविणा कुमरे हिने केले व आभार प्रदर्शन तबस्सुम शेख हिने केले.
