
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
...
बाभुळगाव शहरातील वार्ड नं १ मधील रहिवासी नागरीक मा. हनिफ शेख यांना मुळातच एक हाथ नसुन ते आपल्या एका हातानेच ढकलगाडीवर कटलरीचे सामान ठेऊन शहरभर फिरुन विक्री करुन आपला संसार चालवतात. अठरा विश्व दारिद्र्य असुन रहायला घर म्हनजे फक्त वरुन टिन पत्र व बाजुनं कुडाचे तट्टे असलेल्या घरात राहुन अती स्वाभिमानपणे जिवन जगत असतांना नियतीन त्यांच्यावर घाला घातला व त्यांना अचानक अटँक आला …
परिस्तीतीशी झगडतांना अचानक आलेलं हे संकट पाहुन त्यांच्या पत्नी हतबल होऊन गेल्या. मी लगेच रुग्णसेवक रितेशभाऊ भरुटला कॉल केला व दैवयोगाने ते याच परिसरात आलेले असल्याने त्यांनी या कुटुंबाला स्वतच्या फॉर्च्युनर गाडीत त्यांना बसवुन हृदयरोगतज्ञ “डॉ सतीष चिरडे” यांच्या दवाखाण्यात नेऊन भरती करुन “डॉ सतीष चिरडे” यांना हनिफ शेखच्या परिस्तीतीविषयी सर्व सांगीतले.
डॉ सतिष चिरडे यांनी एकही रुपया न घेता एन्जीओप्लास्टी , एन्जीओग्राफी करुन व चक्क बायपास सर्जरी करुन त्यांना जिवनदान दिलं. या भरती काळामधे रितेशभाऊ भरुट व सौ प्राचीताई भोयर (भरुट) या रोज दत्त हॉस्पीटलला जाऊन त्यांची आस्थेने चौकशी करत असे.
मा. चीरडे सर व रितेशभाऊ भरुट यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं व हनिफ शेख यांना काल सुखरुप सुट्टी मिळाली.
सुट्टी मिळतेवेळी माजी शिक्षणमंत्री “मा. वसंतराव पुरके सर” यांनी दवाखान्यात येऊन हनिफ शेखची भेट घेतली व डॉ चिरडेचे आभार मानुन रितेश भरुट फँमीलीचे विशेष कौतुक केले….
आज हनिफ शेखच्या फँमेलीला या अशा बिकट परिस्थीतीत रितेश भरुट व प्राची भरुट यांनी जे सहकार्य केलं ते खरोखरच वाखानन्याजोगं आहे.
आणी याचं माध्यम मी राहीलो ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे.
आज रितेशभाऊ भरुट सारखे रुग्णसेवक समाजात आहे म्हनुन गोरगरीब आनंदान जगत आहे……
