
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शेतकरी राजु पुरुषोत्तम इंगोले गट नंबर ३२ शेती दोन हेक्टर बारा आर यांच्या शेतात बेंबळाचे पाणी शिरल्याने कपाशी व तुर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त बेंबळा कालव्याचा पाटसऱ्या निकृष्ठ दर्जाच्या बनवल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अशातच वडकी येथील शेतकरी राजु पुरुषोत्तम इंगोले यांच्या शेतातून बेंबळा कँनलची पाटसरी गेली आहे या पाटसरीचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने इंगोले यांच्या शेतात पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे याबाबत एकदा नाही तर दोन दा तक्रार संबंधित अधिकारी यांच्या दाखल करून सुध्दा या शेतकऱ्यांचे शेतात अजूनही एकही अधिकारी फिरकला नाही. तर सतत दोन वर्षे कोरोना महामारी व दोन ते तीन वर्षे गुलाबी बोंड अळीचे आक्रमण या मुळे शेतकरी हवालदिल तर या मधून शेतकरी कसाबसा बाहेर येत नाही तर दुसरे संकट शेतकऱ्यांन पुढे उभे शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? बेंबळा कालव्याचे अभियंता व पाटसरी कंत्राटदार यांच्या चुकी मुळे राजेंद्र इंगोले यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची संबंधित अधिकारी यांनी मोक्का पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व अभियंता व कंत्राटदार यांच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी राजेंद्र पुरुषोत्तम इंगोले यांनी केली आहे.
