
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर मध्यम प्रकल्प मागील विस पंचवीस वर्षांपूर्वी झाला असून हा प्रकल्प एक वरूडवासियासांठी डोकेदुखी ठरत असून या प्रकल्पाला एकच कालवा असल्याने या तलावाच्या सिंचनाचा लाभ बहुतेक वरूड येथील शेतकऱ्यांना मिळत असून बाहेर गावातील शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळत आहे. सोबतच या प्रकल्पात वरूड जहांगीर येथील भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून उर्वरित शेती मात्र तलावाच्या काठावर, पलीकडे व आजूबाजूला आहे.त्याचप्रमाणे वरूड जहांगीर येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पलीकडे व झरगड शिवारात आहे. अशातच शेती करण्यासाठी जातांना नदी पार करून शेतात काम करण्यासाठी जावे लागते.अशातच तलाव ओव्हरप्लो न झाल्यास शेतकऱ्यांना या नाल्यांची काही अडचण नाही.परंतू या वर्षी मात्र सुरवातीलाच तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी बांधवावर फार मोठे संकट उभे ठाकले असून या नदीतून आता मात्र कधी मांडीभर तर कधी कंबरभर तर कधी छातीपर्यंत पाण्यातून पलीकडे जावे लागत आहे.अशातच मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाने काही वर्षाअगोदर ॔ प्रथमोपचार म्हणून वरूड येथील शेतकऱ्यांना एक रपटा बांधून देऊन तात्पुरती मलमपट्टी केली असून या रपट्याने मात्र शेतकऱ्यांना काही फायदा झाला नसून या नाल्यातून आता मात्र कंबरभर, छातीपर्यंत पाण्यातुन कपडे ओले करून जावे लागत असून दिवसभर त्या ओल्या कपड्याने शेतात काम करण्याची पाळी आली असून परत येताना सुद्धा दिवस मावळायच्या अगोदर घरी परतावं लागतं असून उशिरा जर नाला पार करायचे झाले तर दोन्ही बाजूंनी कठडे नसलेला तकलादू पुल कधी कुणासाठी जिवघेणा ठरेल याचा नेम नाही.सोबतच या विभागाने परत एक आजार तयार करून ठेवला असून याच रस्त्याने प्रकल्पावर गाडी घेऊन जाण्यासाठी रस्ता तयार केला असून फक्त मातीकाम करून ठेवले असून शेतकऱ्यांना आपली बैलगाडी मोठी सर्कस करून न्यावी लागते.शेतात रासायनिक खत वगैरे नेतांना बैल चालत नसल्याने खत डोक्यावर घेऊन जावे लागते.अशा एक ना अनेक समस्यांना वरूडवासियांना तोंड द्यावे लागत असून वरूड येथील लोकांचे कुणीच वाली नाही का,ही समस्या कुणाला दिसत नाही का,या गावात या अगोदर कुठलाही पदाधिकारी, नेते, प्रशासकीय अधिकारी आले नाही का,असा सवाल वरूड येथील शेतकरी करत असून या पुलाची उंची कायमस्वरूपी करून शेतकऱ्यांना या संकटातून मुक्त करावे अशी मागणी वरूड जहांगीर येथील रहिवासी श्रावनसिंग वडते सर,रामधन राठोड, जनार्दन कडू,किरण निमट, भानुदास चव्हाण,पुनेश्वर उईके, गजानन ठाकरे,बळीराम जाधव,डोमा जाधव, रामदास चव्हाण सदानंद भोरे, उत्तम भोरे, शंकरराव मेश्राम,उत्तम मेश्राम,सुदाम राठोड, रणजीत पायघन, प्रशांत भोरे,तथा समस्त शेतकरी बांधवांनी केली आहे.
