तेरा वर्षांनंतर आता जाग आली का?,उपसरपंचाचा सवाल…?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

येवती येथील भारत निर्माण योजना ही लोकसहभागातून सन २००६ ०७ मधे मंजूर झालेली असून सन २००८-०९ ला ह्या योजनेस तांत्रिक मंजूरात ही मिळालेली आहे.

वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार व तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी करारपत्र हे सन २००९ मधेच ग्रामपंचायतचे नावाने दिलेले आहे. तसेच त्यात त्यांनी नमूद केलेल्या नुसार योजनेसाठी लागणारी जागा ही ‘बिनशर्त, विना मोबदला ग्रामपंचायतीस दान दिलेली आहे. असे असतांनाही आज जवळपास १३ वर्षानंतर हे काम हे माझ्या शेतात नाही केले तसेच लहान भावाच्या शेतात केले, तर मग करारपत्र लिहून कस काय दिलं ? बर दिलं तर दिलं पण १३ वर्षाच्या नंतर आज ह्या गोष्टीचा साक्षात्कार हा त्यांना झाला याचे नवलच म्हणावे लागेल ? तसेच या

योजनेसाठी लागणारा पाणीपुरवठा हा गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून होत असते, फक्त माहे एप्रिल ते जून, जुलै मध्येच नदीवरून पाणीपुरवठा केला जात असतो. तसेच विहिरीतून ते पाण्याच्या टाकी पर्यंतचे अंतर हे साधारणतः २.५ ते ३ की. मी. दरम्यान चे आहे आणि त्या दरम्यान गावातील १० ते १२ शेतकऱ्यांचा संबंध येतो, पण आजतागायत संबंधित शेतकऱ्यांची एकही तक्रार ही ग्रा. पं. ला आलेली नाही शिवाय यांच्या व्यतिरिक्त… तसेच संबंधित तक्रारकर्त्यांनी स्वीच रूम व विहिरीच्या संबंधी अर्ध्या एकराचा म्हणजे ६ङ६ रूम साठी व ३० ते ३५ फुटाच्या विहिरीसाठी अर्धा एकर शेतजमिनीवर

बेकायदेशीर ताबा घेतला ही गोष्ट एखाद्या विनोदा पेक्षा कमी नाही ? संबंधित विभागाने तक्रार कर्त्यांचा मूळ हेतू तपासून पहावा व त्यामध्ये तांत्रिक विभागाकडून सखोल चौकशी करावी आणि कायम स्वरूपी या प्रकरणाचा बंदोबस्त करून जर कुणी दोधी आढलत असेल त्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया कर्तव्यदक्ष आशिष कृष्णराव पारधी,.. माजी सरपंच तथा उपसरपंच ग्रा. पं. येवती यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.