रानडुकराचा शेतकऱ्यांवर हल्ला,दोघे जखमी : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

घाटंजी तालुक्यातील आमडी येथील शेतकरी मधुकर भुराजी बावणे व केशव राऊत यांच्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शेतशिवार गावा लगत असलेल्या पुंडलीक डंभारे यांच्या शेतात दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. मधुकर भुराजी बावणे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रानडुकराने मधुकर यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. पुढील तपास घाटंजी वनविभाग करीत असून, आर्थिक मदतीची मागणी होत आहे. सध्याच्या शेत शिवारात रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात लावलेले पीक नष्ट करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे, अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून, शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

🔸मदतीची मागणी

शेतमजूर, शेतकरी आसमानी संकटासह विविध संकटाच्या चक्रव्यूहात सापडले आहे. यातच भर म्हणजे वन्यप्राण्यांच्या हल्ले वाढत आहे. याबाबत मदतीची रास्त अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंब करीत आहे.