पुसद तालुक्यातील पिंपळगाव येथे विज कोसळुन दोन बैल व एका गायीचा मृत्यू!

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पुसद तालुक्यातील माळपठारावरील पिंपळगाव ई परिसरात दि.२३एप्रील
२०२२रोजी रात्री मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरु झाला. यावेळी वीज कोसळून दोन बैल व एका गायीचा मृत्यू झाला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पिंपळगाव ई येथील शेतकरी सुरेश आत्माराम राठोड यांनी रोज शनीवारला नेहमीप्रमाणे आपली गुरे शेतात चरण्यासाठी बांधली होती. अचानक रात्रीच्या सुमारास वीजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. याचदरम्यान शेतात बांधुन असलेले दोन बैल व एका गायीच्या अंगावर विज कोसळल्याने तिनजनावराचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की परिसरातील जनावरे व परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा पंचनामा तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले असून नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.