
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील बेलोरी येथे आज दिनांक 24/4/2022 रोजी यवतमाळ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॳॅंड रिचर्स सेंटर द्वारा भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबीराचे उद्घाटन यवतमाळ येथील प्रसिद्ध आरोग्य समाजसेवक श्री रितेशजी भरूट यांच्या हस्ते बेलोरी येथील सरपंच श्रीमती ईंदूबाई सर्वजित मस्के,तिलकराज गुगलिया,सौ.प्राची भरूट, प्रशांत घोडाम ग्राम पंचायत सदस्य,सौ.गीता विष्णू सोयाम, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्या शिबीरात उपस्थित ॾॉ.प्रशांत तामगाडगे, डॉ वरूण डहाके, डॉ विनोद जाधव, डॉ सागर गोक्सूलवार, डॉ सचिन बन्सोड, डॉ सुमित गुरदे, डॉ अजोनिश कांबळे, यांनी अनेक आजारांवर आधारित तपासणी केली .त्यावेळी बेलोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती ईंदूबाई सर्वजित मस्के , आरोग्य सेविका व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.त्या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य , ग्राम पंचायत सदस्य प्रशांत घोडाम,गांधीनगरचे पोलिस पाटील सचिन लिंगे, बेलोरी पोलिस पाटील,सौ. करूणा मस्के मॅडम, ग्राम पंचायत सचिव, जिल्हा परिषद सर्व शिक्षक, आरोग्य सेविका , तालुका कृषी अधिकारी मनोज पवार साहेब, उपस्थित होते.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक विशाल मस्के सर यांनी केले तर प्रास्ताविक डुडुले सर यांनी केले तर चव्हाण सर यांनी आभार मानले.या आरोग्य शिबीरात परिसरातील अनेक लोकांनी आपली तपासणी करून लाभ घेतला.
