
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब येथील बसस्थानक परीसरात असलेल्या चिंतामणी कृषी केंद्रा समोर अनेक दिवसांपासून वाळलेले झाड होते. दि. २६ आक्टोंबर २०२१ चे दुपारी ४ वाजताचे दरम्यान अचानक उभ्या कारवर पडले.
गेल्या अनेक दिवसांपासून चिंतामणी मंदिराकडे येण्याच्या मार्गावर कृषी केंद्रासमोर उभे असलेले झाड वाळून खंग झाले होते. त्यातच मंगळावर आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील बाजारला येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी झाडाचे बाजूला कृषी केंद्र मालकाची कार उभी असतांना कारचे बाजूला खेड्यावरील बाजारला येणाऱ्या इसमाची मोटरसायकल होंडा उभी असतांना अचानक झाड कारवर पडले यामध्ये मोटरसायकल सुध्दा दबल्या गेली मात्र दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी कुणीही उभे नसल्याने जीवीत हाणी टळली.
